एक्स्प्लोर
Advertisement
दिवाळीनंतर पुणे शहराला एकच वेळ पाणी पुरवठा
जलसंपदा विभागाने आता पुणे शहराला दररोज 1150 दशलक्ष लीटरच पाणी देण्याचं ठरवलं आहे.
पुणे : दिवाळीनंतर संपूर्ण पुणे शहराला केवळ एकच वेळ पाणी पुरवठा होणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिली.
जलसंपदा विभाग खडकवासला धरण समुहातून आतापर्यंत पुणे शहरासाठी दररोज 1350 दशलक्ष लीटर पाणी देत होतं. मात्र जलसंपदा विभागाने आता दररोज 1150 दशलक्ष लीटरच पाणी देण्याचं ठरवलं आहे.
गेल्या आठवड्यात कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, हवेली आणि बारामती या दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिकेला पाणी पुरवठ्याचं नव्याने नियोजन करावं लागणार आहे. नियमांप्रमाणे जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेला 1150 दशलक्ष लीटर पाणी देणं अपेक्षित आहे. मात्र पालिका 1600 दशलक्ष लीटर पाणी दररोज उचलत होती.
जलसंपदाने ती मर्यादा आता 1350 दशलक्ष लीटर केली आहे. मात्र दिवाळीनंतर त्यामधे आणखी कपात करुन ती 1150 दशलक्ष लीटर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आतापर्यंत दोन वेळा होणारा पाणीपुरवठा यापुढे एकच वेळ करावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement