एक्स्प्लोर
तरुणीला फोटोंवरुन ब्लॅकमेल, पुण्यात आरोपीला बेड्या
'टिंडर' या डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला ब्लॅकमेल करत 36 हजार रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.
![तरुणीला फोटोंवरुन ब्लॅकमेल, पुण्यात आरोपीला बेड्या Pune : Boy arrested for blackmailing girl through Tinder तरुणीला फोटोंवरुन ब्लॅकमेल, पुण्यात आरोपीला बेड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/17122204/Pune-Tinder-Blackmail.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : सोशल मीडियावर मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे. 'टिंडर' या डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला ब्लॅकमेल करत 36 हजार रुपये उकळल्याचं समोर आलं आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
19 वर्षीय तक्रारदार तरुणीची आरोपीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवून आरोपी तरुणाने तिचे फोटो घेतले. मात्र हे फोटो वायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्याकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली.
29 वर्षीय सुबोजित अभिजीत दासगुप्ता नागपुरातील संदेश सिटीमध्ये राहतो. तर तक्रारदार तरुणी पुणे शहरात इंटिरिअर डिझाईनिंगचं शिक्षण घेते.
सुरुवातीला सुबोजितने तिच्याकडून 36 हजार रुपये उकळले. यानंतरही तो सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करु लागला. यामुळे वैतागलेल्या तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)