Pune BJP News : कंत्राटी भरतीपद्धत हे महाविकास आघाडीचे पाप, माफी मागा; पुण्यात भाजप आक्रमक
राज्यातील कंत्राटी भारती ही महाविकस आघाडीचं (Job Recruitment) पाप असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी माफी मगो आंदोलन करण्यात आले.
पुणे : राज्यातील कंत्राटी भारती ही महाविकस आघाडीचं (Job Recruitment) पाप असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्यावतीने 'महाविकास आघाडी माफी मांगो' आंदोलन करण्यात आले. कंत्राटी भारतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती समोर आणली आहे. सध्याच्या सरकारने त्या बाबतचा जीआर मागे घेतला असला तरी माहविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी भरती झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महविकास आघाडी विरोधात आंदोलन केलं. पुण्यातील गुडलक चौकात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.
'महाविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरतीपध्दत अवलंबण्यात आली महायुतीचे सरकार आल्यानंतर ही कंत्राटीपद्धत कशी चुकीची आहे, हे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे ही पद्धत कोणी आणली हे महाविकास आघाडीला विचारले पाहिजे कंत्राटी भरतीची परंपरा ही काँग्रेसच्या काळात सुरू झाली ती शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारच्या काळापर्यंत कायम होती. हिच कंत्राटी पद्धत महायुतीचे सरकार आल्यानंतर मोडीत काढण्यात आली. त्याचाच तिळपापड होऊन आज महाविकास आघाडीचे नेते आज बेभान होऊन प्रतिक्रिया देत आहेत, या सर्व गोष्टींची माफी महाविकास आघाडीने मागितली पाहिजे, असा घणाघात पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला.
कंत्राटी भरतीने नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला: अजित पवार
राज्यातील कंत्राटी भरतीबाबत बेरोजगार तरुणांमध्ये त्यांच्या नोकऱ्या जाणार, अशा पद्धतीचा गैरसमज विनाकारण पसरवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याधी कुणाच्या काळात कशा पद्धतीने नोकर भरती झाली याविषयी काल पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून वस्तुस्थिती समोर आली आहे. आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी एवढ्या मोठ्या लवकर भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय.
चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा...
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते कंत्राटी भरतीला घेऊन राज्य सरकार आरोप करत होते. खरंतर उद्धव ठाकरे , शरद पवार आणि नाना पटोले हे पिसाळयासारखे राज्य सरकारवर खोटे आरोप करत होते. त्यामुळे त्यांनी नाक घासून जनतेची माफी मागावी. शनिवारी सकाळी 10 पर्यंत माफी मागायला वेळ देत आहे, नाही तर भारतीय जनता पक्ष राज्यभर मोठं आंदोलन उभं करेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Raj Thackeray Pune : सर्किट हाऊसमध्ये मोठ-मोठे बाथरुम, तिथे पळत पळत आंघोळ करायची का? : राज ठाकरे