Raj Thackeray Pune : सर्किट हाऊसमध्ये मोठ-मोठे बाथरुम, तिथे पळत पळत आंघोळ करायची का? : राज ठाकरे
जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास या कार्यक्रमातील मुलाखतीतल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक किस्से सांगितले. त्यातील बीडच्या सर्किट हाऊसचा किस्सा सांगतात सभागृहात हशा पिकला.
पुणे : "राज्यातील सत्तेत सौंदर्यदृष्टी असायला हवी तरच सगळं नीट दिसेल. सरकारमध्ये आर्किटेक्टला कमी आणि महापालिकेतील इंजिनिअरला जास्त महत्व दिलं जातं. त्यात शहर नियोजनाचा विचार केला जात नाही. त्यामुळे शहरं बकाल पडली आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांना योग्य दृष्टी असावी लागते", असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. यावेळी बीडच्या सर्किट हाऊसचं उदाहरण देत त्यांनी सर्किट हाऊच्या रचनेवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, अनेक गेस्ट हाऊसमध्ये भली मोठी बाथरूम असतात. तिथे काय पळत पळत येऊन आंघोळ करायची का ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि सभागृहात हशा पिकला. जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास या कार्यक्रमातील मुलाखतीत ते म्हणाले.
आपलं शहर म्हणून काम करा...
राज ठाकरेंनी धुळ्यातील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "प्रत्येकाने आपल्या शहराचा विचार केला पाहिजे. हे राज्य, हे शहर माझं असं समजून राज्यकर्ते जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत कोणाचं काहीही नीट होणार नाही. धुळ्याला गेलो होतो. हे शहर उत्तम शहर बनू शकतं. असं म्हटलं होतं. मात्र त्यांना अट सांगितली होती. हे शहर पुन्हा बांधलं तरच हे शहर नीट होणार असं सांगितलं तेव्हा ते लोक बघत होते."
शहर नियोजन कोणामुळे बिघडलं?
कोण कुठून येत आहे. काय करत आहे. हे माहित नाही. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यांच्यासाठी सगळे शहरं बदलली जात आहे. फ्लाय ओव्हर बांधले जात आहे. हे सगळं आपल्या लोकांसाठी नाही तर बाहेरुन राज्यात आलेल्या लोकांसाठी सुरु आहे. हे सगळं मतांमुळे झालं आहे. हा सगळा विचका मतांमुळे झाल्याचं ते म्हणाले. राज्यात असलेल्या लोकांमुळे सगळं नियोजन बिघडत नाही तर राज्याच्या बाहेरुन आलेल्या लोकांमुळे शहराचं नियोजन बिघडत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
टाऊन प्लॅनिंगची गरज
महापालिकेत डेव्हलपमेंट प्लॅनिंग होते पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. सौंदर्य दृष्टी सत्तेत असायला लागते. राज्यकर्त्याला ती असेल तर ती खाली पाझरते. महापालिकेत, शासनात इंजिनिअर्स असतात पण टाऊन प्लॅनर नसतात. सरकारमध्ये आर्किटेक्टला कमी आणि महापालिकेतील इंजिनिअरला जास्त महत्व दिलं जातं. त्यात शहर नियोजनाचा विचार केला जात नाही. त्यामुळे टाऊन प्लॅनिंगचा विचार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
बेडरुमच्या मधोमध पलंग, नवदाम्पत्याने पकडापकडी खेळायची का? : राज ठाकरे