पुण्यात भीषण अपघात, सेल्फी पॉईंटजळ दोन जणांचा मृत्यू
Pune Accident : नऱ्हे गाव परिसरातील सेल्फी पॉइंटजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमार अपघात झाला.
Pune Bangalore Highway Accident : पुणे- बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या एका अपघातात (Pune Accident ) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नऱ्हे गाव परिसरातील सेल्फी पॉइंटजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेंपो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 जण जखमी झाल्याचं समजतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजेतय. त्यामुळे या दुर्देवी अपघातील मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईकडे निघालेल्या थिनर टँकरने नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ टेंपो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या प्रयत्न केला. यावेळी टँकरने टेंपो ट्रॅव्हलरला धडक दिली. त्यामुळे टेंपो ट्रॅव्हलर रोडच्या बाजूला असलेल्या पट्टीला धडकला. त्यानंतर टँकरने टेम्पो ट्रॅव्हल व कंटेनर या दोन वाहनाही धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये पाच वाहनांचे नुकसान झालेय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावरील वहानांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्याचं काम रात्री उशीरा पर्यंत सुरू होते. दरम्यान गुरुवारी याच ठिकाणी एका ट्रकने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला होता. महामार्गाच्या सदोष रचनेमुळे हा भाग मृत्युचा सापळा बनलाय.
अपघाताची माहिती मिळाल्यावर (Pune Accident News ) तातडीने एसीपी वाहतूक विजय चौधरी, सिंहगड पोलीस स्टेशनचे (Sinhgad Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, अग्निशमन दलाचे प्रभाकर उब्रटकर, पीएमआरडीए सुजित पाटील, सिंहगड वाहतूक पोलीस शाखेचे उदयसिंह शिंगाडे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा :
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
अजित पवारांचं पुणेकरांना 'गिफ्ट', पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी