एक्स्प्लोर
पुण्यात पतंग उडवताना इमारतीवरुन पडून चिमुरड्याचा मृत्यू
संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना मांजामुळे दुखापत झाल्याच्या किंवा पतंग उडवताना पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर येतात.
पुणे : पतंग उडवताना इमारतीवरुन कोसळून चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. चौथ्या मजल्यावरुन तोल गेल्यामुळे आठ वर्षांच्या अतिक शेखला प्राण गमवावे लागले.
पुण्यातील कोंढवा परिसरात सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एका पडीक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अतिक पतंग उडवण्यासाठी गेला होता. मात्र तोल जाऊन तो खाली कोसळला आणि त्यात अतिकचा जागीच मृत्यू झाला.
अतिक कोंढाव्यातील व्ही. आय. टी कॉलेजच्या मागे राहत होता. या प्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.
संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना मांजामुळे दुखापत झाल्याच्या किंवा पतंग उडवताना पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर येतात. पतंग उडवताना काळजी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement