एक्स्प्लोर
30 वर्ष उलटली, दोन आरोपींचा मृत्यू, पुण्यातील हत्येचा खटला प्रलंबित
पुणे : न्यायासाठी 30 वर्षे वाट पाहिली.. खटल्यातील दोन आरोपींचा मृत्यूही झाला.. मात्र अद्यापही कोर्टानं अंतिम निकाल सुनावलेला नाही.. ही कैफियत आहे पुण्यातील कुऱ्हाडे कुटुंबियांची..
14 ऑक्टोबर 1986 ला रघुनाथ कुऱ्हाडे यांची भररस्त्यात हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील आरोपी शामराव अंदेकर, गणेश अंदेकर, अविनाश अंदेकर आणि विजय यादव यांना सत्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं. मात्र 18 वर्षांनंतर म्हणजेच 2007 मध्ये
मुंबई उच्च न्यायालयानं आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सार्वजनिक शौचालय आणि नळावरून रघुनाथ कुऱ्हाडे आणि अंदेकर या दोन शेजारी कुटुंबांमध्ये बराच काळ कलगीतुरा सुरु होता. घरासमोर सुरु झालेल्या भांडणातून गाडीखाना चौकातील राजेश बोर्डिंग हाऊसपर्यंत पाठलाग करुन आणि तलवार, चाकू, गुप्ती अशा तीक्ष्ण हत्यारांनी नऊ वार करुन 14 ऑक्टोबर 1986 रोजी भरदुपारी रघुनाथ यांचा खून करण्यात आला होता.
रघुनाथ यांची पत्नी शकुंतला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी एकूण 15 आरोपींना अटक करुन, त्यांच्यावर खुनाचा खटला दाखल केला. त्यात शकुंतला आणि रघुनाथ यांची त्यावेळी 23 वर्षांची असलेली मुलगी रोहिणी या दोघींनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. मारेकऱ्यांचा या दोघींनी पाठलाग केला होता.
ज्याच्या रिक्षातून रोहिणीने जखमी रघुनाथ यांना ससून इस्पितळात नेले, त्या सुरेश चव्हाण याची साक्षही महत्त्वाची होती. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. मात्र आरोपींनी शिक्षेविरोधात अपील केलं. घटनेनंतर 30 वर्षांच्या कालावधीत शामराव आंदेकर आणि विजय यादव या दोन आरोपींचा मृत्यूही झाला.
न्यायाला एवढा विलंब होत असेल तर त्याला न्याय म्हणायचं का असा सवाल कुऱ्हाडे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement