NDA : एनडीएची पहिली महिला तुकडी प्रशिक्षणासाठी सज्ज; अक्षय कुमारकडूनही कौतुक
राष्ट्रीय सुरक्षा दलात सहभागी होणारी महिला कॅडेट्सची पहिली बॅच निवडण्यात आली आहे. काही दिवसातच या सगळ्या मुली त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सीमेवर असणार आहेत.
Women in NDA : राष्ट्रीय सुरक्षा दलात सहभागी (NDA) होणारी महिला कॅडेट्सची पहिली बॅच निवडण्यात आली आहे. काही दिवसातच या सगळ्या मुली त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सीमेवर असणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा दलाचा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी या कॅडेट्सची भेट घेतली.
जून 2022 मध्ये 19 महिला कॅडेट्सच्या बॅचला एनडीए पुणे येथे प्रवेश मिळाला होता. यामध्ये 10 आर्मी, 6 एअरफोर्स आणि 3 नेव्ही कॅडेट्सचा समावेश आहे. महिला कॅडेट्सची ही तुकडी मे 2025 मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रुजू होणार आहे. लवकरच त्या मुली त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सीमेवर तैनात होतील. भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड या अकाऊंटवरून महिला कॅडेट्सच्या पहिल्या बॅचचे फोटो शेअर केले आहेत.
भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल ए के सिंह 143 कोर्सच्या पासिंग आऊट परेडसाठी खडकवासल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी यामुलींशीदेखील चर्चा केली. महिला कॅडेट्सची पहिली बॅच असणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये वेगळी उत्सुकता आहे. भारतीय संरक्षण दलांसाठी ऑगस्ट २०२२ हे ऐतिहासिक वर्ष होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर खडकवासला पुणे हे जेंडर न्यूट्रल ट्रेनिंग अॅकॅडमी बनले आहे. या 19 महिला कॅडेट्सचे प्रशिक्षण पुरुष कॅडेट्सप्रमाणे सुरू झाले.
महिला कॅडेट्सच्या पहिली बॅचचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड (Southern Command INDIAN ARMY) यांनी या 19 मुलींचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्या फोटोला सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर देखील त्याचा फोटो व्हायरल होत आहे. आतापर्यंतची पहिलीच मुलीची बॅच असल्याने या सगळ्या मुलींचं देशभरातून विशेष कौतुक केलं जात आहे.
अक्षय कुमार कडूनही कौतुक
या मुलींचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेक दिग्गजांनी हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी या फोटोला दिल्या आहेत. मात्र यातच अभिनेता अक्षय कुमारनेदेखील हा फोटो शेअर केला आहे आणि फोटोला कॅप्शनदेखील दिलं आहे. 'हे चित्र जबरदस्त आहे! राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या महिला कॅडेट्सची ही पहिली तुकडी. मुलींनो तुम्हाला अधिकाधिक बळ मिळो अन् देवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभो,',असं अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्याच्या ट्वीटवर देखील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.