एक्स्प्लोर
देशात अस्वस्थता पसरवणं सरकारचा अजेंडा : प्रकाश आंबेडकर
सरकारचा अजेंडा देशात अस्वस्थता निर्माण करुन दंगली घडवण्याचा आहे, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पुणे : सरकारने गाजर दाखवलं आहे, तसंच सरकारचा अजेंडा देशात अस्वस्थता निर्माण करुन दंगली घडवण्याचा आहे, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. आरक्षण संपवण्यासाठी यज्ञ सुरू आहे, त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. पुण्यात भटक्या विमुक्त जातींचा सत्ता निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या वर्षी 20 डिसेंबरला कोरेगाव मधील मशीद जाळली, त्याचा अद्याप तपास नाही. या सरकारचा अजेंडा दंगली घडवणे हा आहे, मध्यप्रदेशात आरक्षण संपवण्यासाठी बजरंग दल, आरएसएसवाले 51 ठिकाणी यज्ञ करण्यात येत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असा थेट आरोप प्रकाश आंबेडकरांनी भाजप सरकारवर केला आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचारदरम्यान मशीद जाळण्यात आली. कदाचित यातून जातीय हिंसाचार उफाळेल अशी त्यांची अपेक्षा होती, पण मुस्लिमांनी तक्रार दिली नाही. म्हणून ते आता आरक्षणाच्या पाठीमागे लागले आहेत. या सरकारला देशात दंगली घडवायच्या आहेत. हा त्यांचा अजेंडा आहे. जर दंगली झाल्या तर आणीबाणी लादता येईल आणि शांतता होत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, हे सांगायला सरकार मोकळे असं म्हणत सरकारवर निशाणा साधला. तसंच काहीही केलं तरी सरकारला घटना बदलता येणार नाही असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान 13 जूनला प्रकाश आंबेडकर मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत एक गौप्यस्फोट कऱणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement