एक्स्प्लोर
पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य
बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटल्यानं स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांची जंगी मिरवणूक काढली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीच दोर हाती घेत बैलगाडी हाकली.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी हाकली. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पिंपरी-चिंचवडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री पिंपरीच्या दौऱ्यावर होते. बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटल्यानं स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांची जंगी मिरवणूक काढली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीच दोर हाती घेत बैलगाडी हाकली.
दुसरीकडे पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. यानिमित्त
फडणवीसांच्या हस्ते शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा लोगोचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना ढोल
वाजवण्याचा मोह आवरता आला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement