एक्स्प्लोर
प्रभाग आराखडा फुटल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करा: खा. साबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचं राजकीय वातावरण चांगलच तापलंय. पिंपरी-चिंचवड 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेचा आराखडा फुटल्याचा आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला.
पिंपरी-चिचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आराखडा येत्या 7 ऑक्टोंबरला जाहीर होणार होता. मात्र, आराखडा जाहीर होण्यापूर्वीच निवणुक अधिकारी यशवंत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आराखडा पुरवला असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मानेंवर दबाब टाकून आराखडा घेतल्याचा आरोप साबळे यांनी केला. तसेच माने यांची चौकशी करण्याची मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement