(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pimpri-Chinchwad Lockdown | पिंपरी-चिंचवडकरांसाठी कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद? वाचा महत्वाचे मुद्दे
पिंपरी-चिंचवज शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमधील सुधारित नियमावली पालिकेने जाहीर केली. पण आजपासून लागू होणाऱ्या आदेशाची प्रत पालिकेने काल देणं अपेक्षित होतं. पण अंमलबजावणीच्या दिवशी म्हणजे आज (6 एप्रिल) प्रत जाहीर करण्यात आली. यामुळे शहरात सुधारित नियमावलीला घेऊन संभ्रमावस्था निर्माण झाली. तरी ही याचं प्रशासनाला काहीच सोयरसुतक नव्हतं. आज प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या नियमावलीनुसार खालील गोष्टी सुरू होणार आहे.
‘हे’ सुरू राहणार
- अत्यावश्यक सेवा देणारी अस्थापणे
- औषध दुकाने, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा
- भाजी मंडई, फळ विक्रेते, किराणा दुकाने, दुग्धालये, मिठाई-बेकरी-खाद्य दुकाने
- सार्वजनिक वाहतूक : रेल्वे, रिक्षा आणि सार्वजनिक बस
- शेतीशी निगडित कामे
- ई-कॉमर्स सेवा
- मान्यताप्राप्त माध्यम सेवा
- माहिती तंत्रज्ञान विषयक अत्यावश्यक सेवा (20 टक्के उपस्थिती, इतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम)
- पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित आस्थापने
- कुरियर सेवा
- डेटा सेंटर्स
- सार्वजनिक आणि खाजगी सुरक्षा यंत्रणा
'हे' बंद राहणार
- उद्याने, मैदाने आणि क्रीडांगण
- दुकाने बाजारपेठा आणि मॉल
- सार्वजनिक वाहतूक : दुचाकी, रिक्षा (चालक+दोन प्रवासी), टॅक्सी (चालक+50 टक्के आसन क्षमता), बस (आरटीओ मान्यतेनुसार, उभं राहून बंदी)
- सर्व खाजगी आस्थापने
- मनोरंजन आणि करमणूक संबंधित आस्थापना
- रेस्टॉरंट, उपहार गृहे, बार, हॉटेल्स
- धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे
- केशकर्तनालय/स्पा/सलून/ब्युटी पार्लर
- शाळा, महाविद्यालये
- धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम
- उत्पादन क्षेत्र
देशात गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनानं शिरकाव केल्यापासून पहिल्यांदाच देशात नव्या कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 3 हजार 588 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे.
25 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील कोरोनापासून वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण करावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. लसीकरणाचा वयोगट ठरवण्याचा अधिकार केंद्र शासनाचा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिलं आहे.