एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी काही कामगार त्यात फसल्याच बोललं जातंय. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली.

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) मोठी आग लागली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. हे फटाका गोदाम  विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे. 

काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवलं आहे. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.  वाढदिवसाल्या लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता. या लागलेल्या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खास झाल्या आहेत. 

काय म्हणाले पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह?

या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा  कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार  गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

या आगीत मृत्यू झालेल्या सहा जणांची ओळख अजूनही पटलेली नाही मात्र यात 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमींमध्ये 7 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या सगळ्या जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारखान्यात जवळपास 20 ते 25 कामगार काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारात आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरड सुरु करत या कारखान्यातून बाहेर पडले. मात्र सहा जण याच आगीतून स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरले आणि त्यांचा होरपळून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 

जखमींची नावं

उषा पाडवी (वय- 40)
कविता राठोड (वय-35)
रेणुका तातोड (वय-20)
कमल चोरे (वय-35) 
शरद सुतार (वय-50)
प्रियंका यादव (वय-32)
सुमन राधा (वय-40)
अपेक्षा तोरणे (वय-18)

अनधिकृत फटाक्याचा कारखाना, महापालिका कारवाई करणार का?

 
 पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक कारखाने अवैधरित्या चालतात. याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. मात्र या भीषण आगीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अवैधरित्या चालणाऱ्या गोदामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता अशा अवैध कंपन्या किंवा गोदामावर पिंपरी-चिंचवड महापालिका काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
 
 
 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
Pune FDA Mahaprasad : गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget