एक्स्प्लोर

‘स्वागताला बुके नको, बुक द्या’, IPS संदीप पाटलांचा प्रेरणादायी पायंडा

कुठलाही स्वागत समारंभ असो, पुष्पगुच्छ देऊन एखाद्याचं स्वागत करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण आयपीएस संदीप पाटील यांनी आपल्या कृतीतून ही प्रथा मोडीत काढली.

पुणे : कुठलाही स्वागत समारंभ असो, पुष्पगुच्छ देऊन एखाद्याचं स्वागत करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण आयपीएस संदीप पाटील यांनी आपल्या कृतीतून ही प्रथा मोडीत काढली. ‘स्वागताला येताना पुष्पगुच्छ नको तर पुस्तकं आणा,’ असं आवाहन स्वागताला येणाऱ्या लोकांना संदीप पाटील यांनी केलं. विशेष म्हणजे लोकांनीही पाटील यांच्या या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद दिला. आयपीएस अधिकारी संदीप पाटील नुकतेच पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी रुजू झाले. ‘स्वागताला बुके नको, बुक्स आणा’, असं आवाहन पाटील यांनी नागरिकांना केलं आणि बघता बघता हजारो पुस्तकं जमा झाली. मिळालेली ही पुस्तकं गडचिरोली जिल्हातील नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थांना भेट दिली जाणार आहेत. गडचिरोली जिल्हात नक्षलवादविरोधी कारवाईसाठी संदीप पाटील ओळखले जातात. पण पाटील यांची एवढीच ओळख पुरेशी नाही. अनाथ विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘अग्निपंख’ नावाची योजनी सुरु केली. तसंच पोलीस स्थानकात लायब्ररी सुरु करुन पोलिसांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. “याआधी 2016 साली साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारतानाही मी नागरिकांना आणि भेटायला येणाऱ्यांना असंच पुस्तकं भेट देण्याचं आवाहन केलं होतं. तेव्हा जमलेली जवळपास दहा हजार पुस्तके गडचिरोलीच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना भेट दिली,” असं ‘पुणे मिरर’सोबत बोलताना संदीप पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्यभरातील 84 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदावरुन संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget