एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वेग आणि बेशिस्तीवर आता ड्रोनची नजर
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आता ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. राज्य सरकारने गेल्या महिन्यात यासंबंधी घोषणा केली होती. कालपासून याचे प्रात्यक्षिक खंडाळा घाटाखाली सुरु करण्यात आलं. शनिवार आणि रविवार दोन दिवस हे प्रात्यक्षिक घेण्यात येईल.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे. एक्स्प्रेस-वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्यांसह अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर, चुकीच्या पद्धतीन ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता चोवीस तास ड्रोनची नजर राहणार आहे.
रस्ते विकास महामंडळ, 'आयआरबी'च्या वतीने एक्स्प्रेस-वेवर चार ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांविरोधात कारवाईही करण्यात आली आहे.
एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातांमध्ये हजारो मृत्यू
गेल्या काही वर्षांत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातांमध्ये हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसंच गंभीर जखमी किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्यांचं प्रमाणही मोठं आहे. अपघातांमुळे एक्स्प्रेस-वेवर विशेषतः खंडाळा घाटमाथा परिसरात अपघात होऊन कित्येक तास वाहतूक कोंडी होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई आणि पुणे या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्यांना नाहक मनस्ताप होतो.
पुण्यातील 'एरियल मॅपर्स'कडून नियंत्रण
ड्रोनच्या माध्यमातून एक्स्प्रेस-वेवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुण्यातील 'एरियल मॅपर्स' या कंपनीला सोपविण्यात आली आहे. या मोहिमेत 'एरियल मॅपर्स'च्या पथकासह महामार्ग वाहतूक पोलिसांचा सहभाग असणार आहे.
चार ठिकाणी ड्रोनची नजर
खंडाळा घाट
खोपोली एक्झिट ते फूडमॉल
कामशेत बोगदा ते उर्से टोकनाका
खालापूर टोलनाका ते पनवेल
एक ड्रोन चार किलोमीटर अंतरावर नजर ठेवण्यास सक्षम आहे.
येथे होईल कारवाई
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खालापूर टोलनाका,
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उर्से टोलनाका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement