एक्स्प्लोर
Advertisement
सिंधूताईंच्या उद्रेकानंतरही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात
रायगड : मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी संताप व्यक्त केल्याचा प्रकार उलटून काही तास उलटत नाहीत, तोच एक्स्प्रेस वेवर दोन अपघात घडले आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर गुरुवारी सकाळपासून दोन अपघात झाल्याची माहिती आहे. भाताण बोगद्याजवळ सँट्रो कारचा अपघात झाला, तर रसायनी हद्दीजवळ इको कारला अपघात घडल्याचं वृत्त आहे.
सँट्रो कारच्या अपघातात गाडीतील चार जण जखमी झाले आहेत. कारचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती आहे. तर रसायनी हद्दीत झालेल्या इको कारच्या अपघातात चालक जखमी झाला आहे.
आणखी किती जीव घेणार? तळेगाव टोलनाक्यावर सिंधुताईंचा उद्रेक
सिंधुताई सपकाळ यांनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना गुरुवारीच खडे बोल सुनावले होते. पैसे घेऊनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक असुरक्षित आहे, आणखी किती जीव घेणार, असा जाब विचारताना सिंधुताईंचा उद्रेक झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्या डोळ्यादेखतच भीषण अपघात होता होता टळला. त्या गाडीमध्ये लहान मुलांसह वीसच्या जवळपास महिलांचा समावेश होता. हा प्रसंग प्रत्यक्ष घडताना पाहून सिंधुताई उद्विग्न झाल्या आणि त्यांनी न राहवून टोलनाक्यावरच संताप व्यक्त केला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement