एक्स्प्लोर
मराठा आरक्षणावर ताबडतोब मार्ग काढा, अन्यथा... : उदयनराजे
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद पार पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 100 समन्वयक उपस्थित होते. मराठा मोर्चाची पुढील दिशा काय असेल, यावर या परिषदेत मंथन झालं.
पुणे : मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद पार पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 100 समन्वयक उपस्थित होते. मराठा मोर्चाची पुढील दिशा काय असेल, यावर या परिषदेत मंथन झालं.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल, मात्र आत्महत्या किंवा तोडफोड करु नका, असे आवाहन खासदार उदयनराजेंनी यावेळी केले.
आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले, असा आरोप उदयनराजेंनी केला.
सर्व राज्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती, आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असे म्हणताना उदयनराजे पुढे म्हणाले, “आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार? मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं. आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका. मराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.”
खासदार उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार - खा. उदयनराजे
- मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल, पण आत्महत्या किंवा तोडफोड करु नका - खा. उदयनराजे
- आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला - खा. उदयनराजे
- सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले - खा. उदयनराजे
- सर्व राज्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती, आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल- खा. उदयनराजे
- आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार? - खा. उदयनराजे
- मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं - खा. उदयनराजे
- आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये - खा. उदयनराजे
- मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका - खा. उदयनराजे
- मराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही - खा. उदयनराजे
- 30 वर्षांपासून मराठा आरक्षणावर केवळ चर्चाच होतेय - खा. उदयनराजे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement