एक्स्प्लोर
Advertisement
गिर्यारोहक पद्मेश पाटील उपचारासाठी पुण्यात दाखल, प्रकृती धोक्याबाहेर
पद्मेश पाटील आता शुद्धीवर असून त्याची परिस्थिती सध्या धोक्याबाहेर आहे.
पुणे : गिर्यारोहक पद्मेश पाटील अखेर पुण्यात दाखल झाला आहे. अपघातग्रस्त गिर्यारोहक पद्मेश पाटीलला पुढील उपचारासाठी चंदीगढहून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणण्यात आले आहे.
पद्मेश पाटील आता शुद्धीवर असून त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
ट्रेकिंग करताना लडाखमधल्या स्टोक कांग्री शिखराजवळ कोसळलेल्या पुण्याच्या पद्मेश पाटीलची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर चंदीगढमधल्या लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु होते.
18 हजार फुटांपर्यंत यशस्वी चढाई, पण....
लडाखच्या कुशीत 20 हजार फूट उंचीवर वसलेला आणि भल्या भल्या ट्रेकर्सना आव्हान देणारं स्टोक कांग्री शिखर. पुण्याचा पद्मेश पाटील आणि त्याच्या दोन मित्रांनीही स्टोक क्रांगी सर करायचं आवाहन स्वीकारलं. 9 ऑगस्टला प्रवास सुरु झाला.
अथक चढाईनंतर पद्मेश आणि त्याचे मित्र स्टोट क्रांगीच्या पायथ्याशी पोहोचले. मात्र हवामान खराब झाल्यामुळं मित्रांनी पुढे न जाण्याचं ठरवलं. पद्मेशला मात्र शिखर खुणावत होतं. मित्रांना मागे सोडून त्यानं एकट्यानंच ट्रेकिंग करायचं ठरवलं.
त्यानं जवळपास 18 हजार फुटापर्यंत यशस्वी चढाई केली. 15 ऑगस्टचा दिवस होता. स्टोक कांग्री पद्मेश पाटीलपासून फक्त 2 हजार फूट दूर होतं. मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पद्मेशच्या फुफ्फुसात पाणी जमा झालं. तशा अवस्थेत तो 18 हजार फूट खोलवर कोसळला.
पद्मेशच्या अपघाताची माहिती मिळताच, त्याच्या मित्रांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं त्याला लेहमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र पद्मेशची परिस्थिती खालावत चालल्यामुळे त्याला अद्यावत रुग्णालयामध्ये भरती करणं गरजेचं होतं.
एबीपी माझानं पद्मेशच्या मदतीसाठी आवाहन केलं. पुण्यातल्या भाजप नेत्यानं मुख्यमंत्री कार्यालयाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वायुवेगानं सूत्र फिरली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंशी संपर्क साधण्यात आला. भामरेंच्या आदेशानंतर पद्मेशला चंदीगडमधल्या लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
अखेर चंदीगढमधल्या लष्करी हॉस्पिटलमधून पद्मेश पाटीलला पुण्यात हलवण्यात आले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पद्मेशवर उपचार सुरु करण्यात आले असून, त्याची प्रकृता आता धोक्याबाहेर आहे.
संबंधित बातम्या :
लडाखमध्ये दरीत पडलेल्या पुण्याच्या पद्मेशवर चंदीगढमध्ये उपचार
पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement