एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Precautions During Trek : ट्रेकला जा, मजा करा पण जाण्यापूर्वी 'ही' खबरदारी नक्की घ्या!

पावसाळा सुरु झाला की अनेक तरुण मंडळी ट्रेकला जातात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक दऱ्या खोऱ्यांमध्ये आणि डोंगरांमध्ये तरुण मंडळी वर्षा विहाराचा आनंद लुटत असतात.

Precautions During Trek : पावसाळा सुरु झाला की अनेक (Trek ) तरुण मंडळी ट्रेकला जातात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक दऱ्या खोऱ्यांमध्ये आणि डोंगरांमध्ये तरुण मंडळी वर्षा विहाराचा आनंद लुटत असतात. मात्र यातच अनेक तरुण अति उत्साहीपणा दाखवतात आणि जीव गमावतात. आतापर्यंत अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. पावसाळी ट्रेक आणि त्यात नाईट ट्रेक करताना दरीतून कोसळण्याच्या घटना आणि रस्ता विसरण्याच्या घटना समोर येतात. यामुळे अनेक पालक मुलांना ट्रेकला पाठवण्यासाठी घाबरतात. पोलिसांकडूनही तरुणांना ट्रेक करताना काळजी घेण्याचं, अतिउत्साहीपणा न करण्याचं, महत्वाचं म्हणजे फोटो काढताना आणि व्हिडीओ काढताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं मात्र या सगळ्या आवाहनांकडे लक्ष न देता. अनेक तरुण अतातायीपणा करतात. त्यामुळे ट्रेकला जाताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? हे देखील ट्रेकरला माहिती असायला हवं. 

ट्रेक करताना कोणती काळजी घ्याल...

-एकट्याने ट्रेकिंगला जाण्यापेक्षा एखाद्या संस्थेतून किंवा ग्रुपसोबत जाणे केव्हाही चांगले. 
-ट्रेकिंग गाईड सर्व ट्रेकिंग उपकरणे पुरवत असल्याची खात्री करा.
-ट्रेक करताना लवकर वाळणारे कपडे घाला.
-शक्यतो ट्रेकिंग शूज घाला.
-तुमचे गॅझेट पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 2 मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जा.
-रेन कोट बाळगायला विसरू नका.
-ट्रेकिंग दरम्यान हायड्रेटेड रहा.
-जंगल आणि चिखलातून फिरताना जळू तुमच्या पायांवर हल्ला करत असल्यास जळू ओढू नका.
-प्रथमोपचार किट वापरा किंवा डॉक्टरांना भेट द्या
-माहीत नसलेल्या मार्गाचा अवलंब करू नका.
- तुमच्या मार्गदर्शकाच्या सूचनांप्रमाणेच ट्रेक करा. 
-निसरड्या रस्त्यांवर चालताना काळजी घ्या. 
-वाटेत नदी-नाले ओलांडताना अतिसाहस करू नका. 
-नदी लहान असली तरी प्रवाहाच्या वेगामुळे वाहून जाण्याचा धोका असतो.
-फोटो काढण्यासाठी डोंगराच्या बाजूला किंवा तलावाजवळ जोखमीची पोझेस देऊ नका त्यामुळे तोल जाण्याची भीती असते.

ट्रेकिंगसाठी अनेकांना माहीत नसलेले किल्ले-

किल्ले जीवधन हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला असुन प्रचंड उंचावर आहे. या ठिकाणाहून दिसणारे मनमोहक कोकणकडा आणि समोरील वनरलिंग सुळक्याचे दृश्य मनाला आनंद देऊन जाते. घनदाट झाडीतून प्रवास करताना धुक्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेता येतो. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला जुन्नर शहरात यावे लागते तेथून हा किल्ला 29 किमी अंतरावर आहे,तर पुण्यातून 123 किमी आणि मुंबई पासून 122 किमी आंतरावर आहे. वनरलिंगी सुळका हा किल्ले जीवधनच्या अगदी समोर असून त्याची उंची जमिनीपासून 385 फुट आहे. हा सुळका पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी पर्वणीच समजला जातो.सोशलमीडियावर प्रचंड चर्चेत असणारा हा वनरलिंगी सुळका पुणे मुंबईपासून  किमान130 किमी आहे.

हे ही वाचा-
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget