एक्स्प्लोर
'हा' देशातील सर्वात धोकादायक किल्ला! फोटो पाहून तुम्हाला कळेल आम्ही असं का म्हणतोय?
India's Most Dangerous Fort : भारतात असे अनेक किल्ले आहेत, जे अतिशय सुंदर पण तितकेच धोकादायकही आहेत. यातीलच एक किल्ला म्हणजे प्रबळगड.

India's Most Dangerous Fort
1/8

महाराष्ट्रातील माथेरान आणि पनवेल दरम्यान असाच एक किल्ला आहे, ज्याची गणना भारतातील धोकादायक किल्ल्यांमध्ये केली जाते. हा किल्ला प्रबळगड किल्ला म्हणून ओळखला जातो.
2/8

हा किल्ला कलावंती किल्ला आणि कलावंतीण दुर्ग या नावानं प्रसिद्ध आहे. 2300 फूट उंच टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्यावर कमी लोक येतात आणि जे येतात ते सूर्यास्तापूर्वी गड उतरतात.
3/8

एका सरळ डोंगरावर दगड फोडून वाट काढत हा गड बनवण्यात आला आहे. या किल्ल्यावर जायचा रस्ता अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात धोकादायक किल्ला मानला जातो.
4/8

खडक फोडून पायऱ्या तयार करत हा गड बांधण्यात आला आहे. या दगडी पायऱ्यांवर दोऱ्या किंवा रेलिंग नाही. त्यामुळे हा सरळ किल्ला चढणं फार कठीण आहे, वाटेतील एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
5/8

वाटेतील एक चूक किंवा पाय घसरल्यास खाली थेट खोल दरी आहे. या किल्ल्यावरून पडून अनेकांचा मृत्यूही झाला आहे.
6/8

प्रबळगड अर्थात कलावंतीण दुर्गाला इतिहासात खास स्थान आहे. मुरंजन गड असं या किल्ल्याचं सुरुवातीचं नाव यादवांनी त्याकाळी गडाला हे नाव दिलं होतं. प्रबळगड व्यापारी मार्गावर आणि समुद्री मार्गाजवळ असल्यामुळे येथे यादव काळात लष्करी तळ उभारण्यात आलं होतं.
7/8

छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव कलावंतीण दुर्ग असं ठेवलं. प्रबळगड आधी प्रहरीदुर्ग या नावाने ही ओळखला जात होता.
8/8

प्रबळगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. पश्चिम घाटातील हा एक भव्य किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर आहे. येथून इर्शालगड किल्ला आणि कल्याण किल्ल्याचे विहंगम दृश्य पाहता येते.
Published at : 03 Jul 2023 12:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
