एक्स्प्लोर

भाजपच्या निष्ठावंतांची गळचेपी, अश्विनी जगताप आणि शंकर जगताप आतून एकच, दोघांनाही तिकीट देऊ नये :  अमोल थोरात

अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि शंकर जगताप (Shankar Jagtap) आतून एकच आहेत. या दोघांनाही चिंचवड विधानसभेची उमेदवारी देऊ नये, असे मत माजी सरचिटणीस अमोल थोरात (Amol Thorat) यांनी व्यक्त केलं आहे.

Pune Chinchwad News: भाजप आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि शंकर जगताप (Shankar Jagtap) आतून एकच आहेत. चिंचवड विधानसभेची (Chinchwad Vidhansabha) उमेदवारी या दोघांनांही देऊ नये, असे मत माजी सरचिटणीस अमोल थोरात (Amol Thorat) यांनी व्यक्त केलं आहे. उमेदवारीवरुन दोघे गृहकलह दाखवून, भाजपवर (BJP) दबाव टाकत आहेत. याद्वारे त्यांना आपल्या घरातचं पदं राखायचे आहे, असा आरोप अमोल थोरातांनी केलाय.

दिर-भावजयच्या राजकारणात भाजपच्या निष्ठवंतांची गळचेपी

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील दिर-भावजय हे एकच आहेत. उमेदवारीवरुन दोघे गृहकलह दाखवून, भाजपवर दबाव टाकत आहेत. याद्वारे त्यांना आपल्या घरातचं पदं राखायचे आहे, असं भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरातांनी केलाय. थोरात हे एकेकाळी दिवंगत लक्ष्मण जगतापांचे निकटवर्तीय होते. मात्र, आता ते आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दिर-भावजयच्या राजकारणात भाजपच्या निष्ठवंतांची गळचेपी होत असल्याचा आरोप करत आहेत. त्याच अनुषंगाने राजकीय स्वार्थ, घराणेशाही आणि गृहकलह असा उल्लेख करून एक व्यंगचित्र ही थोरातांनी साकारलं आहे. भाजपमधील एका निष्ठवंताने जगताप दिर-भावजयला विरोध केल्यानं महायुतीत आणखी तिढा वाढणार हे निश्चित आहे.

अश्विनी जगताप यांच्या मतदारसंघावर दीर शंकर जगताप यांचा दावा

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap)  यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांच्या मतदारसंघावर दीर  पिंपरी- चिंचवड (Pimpri- Chinchwad)   भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap)  यांनी दावा ठोकलाय. त्यानिमित्ताने जगताप कुटुंबातील वादाचा दुसरा अंक जाहीरपणे समोर असल्याची चर्चा झाली. त्यामुळं चिंचवड पोटनिवडणुकीवेळी भाजपमध्ये (BJP)  निर्माण झालेली परिस्थिती यावेळी पुन्हा उद्भवणार हे आता उघड आहे. दरम्यान, लक्ष्मण जगतापांची मीच खरी उत्तराधिकारी आहे, असं म्हणत मी आगामी चिंचवड विधानसभा (Chinchwad Vidhan Sabha Election)  लढणार असं ठामपणे अश्विनी जगताप म्हटलंय. त्यामुळं बारामतीतील पवार कुटुंबाप्रमाणे चिंचवडमधील जगताप कुटुंबात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा गृहकलह निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

साहेबांची जी कामे अपूर्ण होती, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला

साहेबानंतर मलाच पक्षाने मान दिला होता. त्यानंतर साहेबांची जी कामे अपूर्ण होती, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. शास्ती कर, कचरा डेपो, आयुक्तालयाचा प्रश्न असे बरेचसे प्रश्न मी सोडवले आहेत. माझ्या एक वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार असल्याचे अश्विनी जगताप यांनी सांगितले होते. 

महत्वाच्या बातम्या:

राजकारणामुळं पुण्यातील आणखी एका कुटुंबात गृहकलह, विधानसभेला दीर भावजय आमने सामने?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget