राजकारणामुळं पुण्यातील आणखी एका कुटुंबात गृहकलह, विधानसभेला दीर भावजय आमने सामने?
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवड विधानसभेच्या आमदार आहेत. मात्र वहिनींच्या मतदारसंघावर आता थेट दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे.
![राजकारणामुळं पुण्यातील आणखी एका कुटुंबात गृहकलह, विधानसभेला दीर भावजय आमने सामने? Vidhan Sabha Election 2024 Laxman Jagtap Wife Ashwini jagtap vs shanka Jagtap Chinchwad Maharashtra News राजकारणामुळं पुण्यातील आणखी एका कुटुंबात गृहकलह, विधानसभेला दीर भावजय आमने सामने?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/d11a31ea24e23503e5674b09fab1b205171820138978489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी- चिंचवड : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांच्या मतदारसंघावर दीर लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू आणि पिंपरी- चिंचवड (Pimpri- Chinchwad) भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी दावा ठोकला आहे. त्यानिमित्ताने जगताप कुटुंबातील वादाचा दुसरा अंक जाहीरपणे समोर आला असल्याची चर्चा झाली. त्यामुळं चिंचवड पोटनिवडणुकीवेळी भाजपमध्ये (BJP) निर्माण झालेली परिस्थिती यावेळी पुन्हा उद्भवणार हे आता उघड आहे.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवड विधानसभेच्या आमदार आहेत. मात्र वहिनींच्या मतदारसंघावर आता थेट दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे. काही ही झालं तरी मी चिंचवड विधानसभेतून लढणार, असा ठाम निश्चय शंकर जगतापांनी केलाय. मात्र वहिनी अश्विनी जगताप रिंगणात असल्यावर ही तुम्ही लढणार का? हे येणारा काळ ठरवेल.मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे, असं म्हणत शंकर जगतापांनी संभ्रमावस्था ही कायम ठेवली आहे.
पिंपरी विधानसभेवर भाजपचा डोळा
दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. मात्र या दोन्ही विधानसभा तर आम्ही मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला सोडणार नाहीच, उलट त्यांच्या पिंपरी विधानसभेवर ही आमचा डोळा असल्याचं म्हणत जगतापांनी महायुतीच्या तिढ्याला आणखी फोडणी दिली.
शंकर जगताप म्हणाले, भोसरी आणि चिंचवड विधानसभा सोडण्याचा प्रश्न येतच नाही. कारण लोकसभेत जी महायुती होती तीच विधानसभेत राहणार आहे. महायुतीचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे. जे पूर्वी खासदार होते त्याच पक्षाला लोकसभेला तिकिट दिले. आता तोच फॉर्म्युला विधानसभेला लागू होणार आहे. जिथे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्याच पक्षाला जी जागा सुटली जाणार आहे. लोकसभेचा निकाल आणि भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता येणाऱ्या विधानसभेत पिंपरीच्या जागेची मागणी करणार आहोत.
शंकर जगताप निवडणूक लढवण्यास इच्छुक
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यावेळी शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती.
हे ही वाचा :
Sharad Pawar : चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे : शरद पवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)