एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यातील दूधसाठा संपण्याच्या मार्गावर, उद्यापासून चितळेही बंद
दूध आंदोलनाची झळ सर्वसामान्यांना फारशी बसत नसली तरी घाऊक पद्धतीने दूध खरेदी करणाऱ्यांना आज अडचणींना समोरं जावं लागत आहे.
पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा फारचा परिणाम जाणवला नसला तरी, दुसऱ्या दिवशी दुधाचा काहीसा तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यातील दूधसाठा दुपारपर्यंत संपेल, असा अंदाज चहा स्टॉल आणि डेअरी मालकांनी व्यक्त केला आहे.
दूध आंदोलनाची झळ सर्वसामान्यांना फारशी बसत नसली तरी घाऊक पद्धतीने दूध खरेदी करणाऱ्यांना आज अडचणींना समोरं जावं लागत आहे. आंदोलनाची कल्पना असल्याने अनेकांनी दुधाचा साठा करुन ठेवला. परंतु तो साठाही आज दुपारपर्यंत संपेल, असं चहा तसंच डेअर प्रोडक्ट विक्रेत्यांनी सांगितलं.
तर गेल्या दोन दिवसांपासून चितळेंचे दूध संकलन बंद आहे. त्यामुळे पुण्यात उद्यापासून चितळेंचे दूध मिळणार नाही. इतर दुकानांमध्ये आज विक्रीसाठीही दूध उपलब्ध नाही.
पुण्याकडे येणारी दुधाची वाहनं ठिकठिकाणी अडवली जात आहेत. त्यामुळे दूध आंदोलन सुरु राहिलं आणि त्यामुळे दुधाचा पुरवठा झाला नाही तर सर्वसामान्य नागरिकांपासून चहा स्टॉल, डेअर प्रॉडक्ट मालकांना उद्या मोठ्या अडचणींना सामना करावा लागू शकतो.
नेमक्या मागण्या काय?
- दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.
- पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.
- या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement