एक्स्प्लोर
Advertisement
तरुणाची चक्क वाघाच्या पिंजऱ्यात उडी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे: पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात शुद्धोधन वानखेडे या तरुणानं थेट वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शुद्धोधन प्राणिसंग्रहालयात गेला होता. त्यावेळी तेथील एका वाघाच्या डोक्यावरुन हात फिरवत होता. ते पाहून तेथील सुरक्षारक्षकानं त्याला बाजूला जाण्यास सांगितलं. त्यामुळं दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर शुद्धोधननं थेट शेजाऱ्याच्या कैफ नावाच्या पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यातत उडी मारली. त्यावेळी वाघ आणि त्याच्यामध्ये काहीसं अंतर होतं. मात्र सुदैवानं वाघानं त्याला कोणतीही इजा पोहोचवली नाही.
हा सर्व प्रकार लक्षात येताच तेथील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधन राखून शुद्धोधनला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यावेळी शुद्धोधन बरीच बडबड होता. त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणानं कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात काही काळ एकच खळबळ उडाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement