एक्स्प्लोर

Lumpy Pune : लम्पी रोखण्यात पुणे जिल्हा अव्वल; राज्यातील सगळ्यात कमी मृत्यू पुण्यात

Lumpy Pune : प्राण्यांना होणाऱ्या लम्पी विषाणूचा संसर्ग राज्यभरात कमी होत आहे. त्यात लम्पी रोखण्यात पुणे अव्वल ठरलं आहे. मृत्युमुखी झालेल्या पशूंपैकी सर्वांत कमी मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत.

Lumpy Pune : प्राण्यांना होणाऱ्या लम्पी (lumpy) विषाणूचा संसर्ग राज्यभरात कमी होत आहे. त्यात लम्पी रोखण्यात पुणे (Pune) अव्वल ठरलं आहे. मृत्युमुखी झालेल्या पशुंपैकी सर्वांत कमी मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पुणे जिल्ह्यात केवळ 633 तर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सर्वाधिक 4,510 पशुंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला लम्पी रोखण्यात यश आलं आहे. 

लसीकरणामुळे नियंत्रण मिळण्यात यश
लम्पी आजार पसरण्याला सुरुवात होताच पुणे जिल्ह्यात लसीकरणावर (Vaccination) भर दिला होता. पुणे जिल्ह्यात तातडीने केलेल्या लसीकरणामुळे पशुंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आल्यामुळे जिल्ह्यातील मृत्युदर कमी आहे. राज्यात अनेक शहरात लसीकरणावर भर दिला नव्हता त्यामुळे लम्पीमुळे मृत्यू झाले. लसीकरण करा, असं आवाहन करण्यात येत होतं. योग्य उपाययोजनादेखील करणं गरजेचं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केल्याने पुणे जिल्हा जनावरांचा मृत्यू रोखू शकला. 

राज्यातील परिस्थीती काय?
राज्यात 35जिल्ह्यांमध्ये तीन लाख 54 हजार 247 पशुंना संसर्ग झाला आहे. त्यापैकी दोन लाख 71 हजार 465 पशू उपचाराने बरे झाले आहेत; मात्र 24 हजार 767 पशुंचा मृत्यू झाला आहे. नुकसान भरपाईपोटी जनावरांच्या मालकांना 29 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. एक कोटी 39 लाख 47 हजार पशुंचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यात लम्पी रोग रोखण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात आलं. त्यासाठी सरकारी वाहनं उपलब्ध करुन देण्यात आली. तसंच दीड लाखांहून अधिक लसदेखील खरेदी करण्यात आल्या. रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. दूध संघांनी केलेल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 633 जनावरे बाधित असून त्यातील 38 जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 633 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हा आकडा राज्यातील आकडेवारीच्या तुलनेत कमी आहे,' असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. लम्पीमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत पुणे जिल्हा बाराव्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?
बुलढाणा - 4110
अहमदनगर - 2928
अमरावती - 2393
जळगाव - 2339
सोलापूर -1823
अकोला - 1470
सातारा - 1079
सांगली - 910
औरंगाबाद - 845
जालना - 696
वाशिम - 666
पुणे - 633

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget