Pune : पुण्यात यापुढे वाहतूक पोलीस तात्काळ दंड घेणार नाहीत, सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई होणार
Pune Police : पुणे पोलीसांकडून वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांकडून दंड घेण्यास स्थगिती देण्यात आली आहे.

पुणे : मोटारसायकल किंवा स्कूटर घेऊन रस्त्यावरून जाताना वाहतुकीचे (Pune Traffic Police) नियमांचे पालन केले नाही तर वाहतूक पोलीस चलन कापून दंड आकरतात हे चित्र आपण कायम पाहतो. मात्र आता पुण्यात वाहतूक पोलीसांना थेट दंड (Challan) आकारणार नाहीत. कारण पुण्यात (Pune News) आता सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातूनच दंड आकारला जाणार आहे, पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे पोलीसांकडून वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांकडून दंड घेण्यास स्थगिती देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडाच्या रुपात पैशांची लूट होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आलाय. पुढील आदेशापर्यंत वाहतुक पोलीसांना फक्त वाहतुकीचे नियमन करावे लागणार आहे. कोणालाही दंड करता येणार नाही.
वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर वाहतूक पोलीस चलन कापून दंड आकारला जातो. बऱ्याचदा वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे असते की त्याने नियमांचे उल्लंघन केले नाही मात्र पोलीस बळजबरी करून दंड आकारतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांबाबत अनेक तक्रारी समोर आल्याचे पाहायला मिळते. कित्येक वेळा रस्त्यावरच वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये वाद होतात, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) कारवाई करायची नसली तरीही बेशिस्त वाहनचालकांना (Two Wheeler) अटकाव करण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच पुण्यात दंड आकारला जाणार आहे. म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Cycle Rally : पर्यावरण जनजागृतीसाठी 'पेडल अप सायकल रॅली' आयोजन, मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
मुंबईत आता प्रत्येक बुधवारी असणार "नो हॉंकींग डे", मुंबई पोलिसांकडून विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्याविरोधात विशेष मोहीम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
