मुंबईत आता प्रत्येक बुधवारी असणार "नो हॉंकींग डे", मुंबई पोलिसांकडून विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्याविरोधात विशेष मोहीम
Mumbai News : वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यासह नो हॉर्निंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जास्तीत जास्त वाहनचालकांवर चालान कारवाई केली जाणार आहे.
Mumbai News Update : मुंबई शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस शाखेने (Mumbai Traffic Police ) विशेष मोहीम राबवली आहे. यापुढे दर बुधवारी 'नो हॉंकिंग डे'(NoHonkDay ) मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईतील सर्व वाहतूक विभागातील प्रभारी पोलीस निरीक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रात दर बुधवारी पूर्ण दिवस नो हॉंकिंग डे आयोजित करतील.
दर बुधवारी सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना नो हॉन्किंग चिन्ह/बॅनर दाखवेल जाईल. त्याचबरोबर नो हॉर्निंगच्या मुद्द्यावर चालकांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून शनिवारी मुंबईतील अनेक भागात याबाबत जनजागृती करण्यात आली. पोलिनांनी वाहचालकांना भेटून याबाबत माहिती दिली. मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्विटरवर या मोहिमेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
आपल्या मुंबईला ध्वनी प्रदुषणमुक्त करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचा एक अनोखा प्रयत्न!#PauseTheHonk #HornFreeMumbai #NoHonkingDay pic.twitter.com/skvj5ePUum
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 28, 2022
'नो हॉंकिंग'च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यासह नो हॉर्निंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जास्तीत जास्त वाहनचालकांवर चालान कारवाई केली जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. याबरोबरच वाहनचालंकांना 'नो हॉंकिंग डे'बद्दल काही शंका असल्यास वाहतूक नियंत्रण कक्षातील क्रमांक 8454999999 वर संपर्क साधावा असे अवाहन मुंबई वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील लोकांमध्ये नजागृती करण्यासाठी 'नो हॉंकिंग डे'बद्दल माहिती दिली आहे. "तुमच्या किंवा माझ्या रस्त्यावर कुठेही हॉर्न वाजवणे योग्य नाही. शनिवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत 'नो हॉंकिंग डे' निमित्त मुंबईतील रस्त्यांवर जनजागृती मोहीम राबवली." असे ट्विटर वर म्हटले आहे.
ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी खास मोहीम
मुंबईत वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीसह ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे वाढत्या ध्वनी प्रदुषणावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस वाहतूक शाखेने 'नो हॉंकिंग डे' ही विषेष मोहीम राबवली आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहनचालकांमध्ये या मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्यात येणार आहे.