(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : शिवसेनेचे रघुनाथ कुचीक यांची 'ती' टेस्ट खोटी, बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीची DNA चाचणीची मागणी
शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक (Shivsena Leader Raghunath Kuchik) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
Pune News : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक (Shivsena Leader Raghunath Kuchik) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रघुनाथ कुचीक यांनी एक चाचणी करत मी वडील होऊ शकत नाही असं वैद्यकीय रित्या सिद्ध झालं असल्याचं सांगितलं होतं. मात्र रघुनाथ कुचीक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असून माझं गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं होतं असा आरोप देखील पीडीतेने केला आहे.
कुचीक यांची 'ती' टेस्ट खोटी
रघुनाथ कुचीक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत आहेत, आतापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता, पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी रघुनाथ कुचीक यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडितेने केली आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन मी मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं देखील त्या पिडीतेने आज पुण्यात पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे
'त्या' नंबरचा मी फॉरेन्सिक रिपोर्ट काढून कोर्टात देणार
रघुनाथ कुचीक नेहमी मला मेसेज करायचे, आणि आता ते म्हणतात की माझा नंबर मोर्फ करून वापरला गेला, मात्र तसं नसून मी त्या नंबरची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे आणि ती टेस्ट सरकारी असते. ज्या फोरेन्सिक टेस्टमधून सगळे काही उघड झाल असून आता ती फॉरेन्सिक रिपोर्ट देखील मी कोर्टात देणार असल्याचं तरुणीने सांगितले आहे.
महिला आयोगाने माझं कधीच ऐकलं नाही
या सगळ्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचीक यांच्या मुलीने आरोप करत असलेल्या तरुणीची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली आहे. आता त्यावर विचार होत असल्याचं सांगितलं जात आहे.त्यावर बोलताना या पीडितेने मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला उत्तर दिलं नाही. ज्याप्रमाणे रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची मागणी मान्य झाली तसेच न्याय मलाही मिळावा अशी अपेक्षा पीडित तरुणीने आज बोलताना व्यक्त केली आहे.शिवसेनेचे रघुनाथ कुचीक यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर आरोप करणारी तरुणी माध्यमांसमोर आली असून "संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली पण मिळाली नाही. कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले" असं तरुणी म्हणाली.
संबंधित बातम्या