136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
अभिनेता एजाज खानच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या छापेमारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : बिग बॉस फेन अभिनेता एजाज खान (Actor Ajaz Khan) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवली होती. इन्स्टाग्रावर लाखोंनी फॉलोअर्स असलेल्या एजाजला मात्र निवडणुकीत 500 पेक्षा कमी रुपये मिळाले. एजाज नेहमीच कोणत्यातरी कारणामुळे वादाचे कारण बनतो. सध्या तो त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एजाजची पत्नी फेलॉन गुलीवाला यांना ड्रग्जच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणात 8 ऑक्टोबर रोजी त्यांचे नाव समोर
मिळालेल्या माहितीनुसार गुलीवाला यांच्या स्टाफमधील एका सदस्याने कुरिअरद्वारे 100 ग्रॅम मेफेड्रोन (एमडीएमए) मागवले होते. या प्रकरणात एजाजच्या स्टाफमधील सदस्याला एका महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता गुलीवाला यांना अटक करण्यात आली आहे. एजाज खान यांची पत्नी फेलॉन या परदेशी आहेत. एका ड्रग्ज तस्करी प्रकरणात 8 ऑक्टोबर रोजी त्यांचे नाव समोर आले होते. कस्टम विभागाने ड्रग्ज असलेल्या कुरिअरला ट्रॅक करून एजाजचा पियून सुरज गौड याला अटक केलं होतं. एजाज खान याचे अंधेरीत एक कार्यालय आहे. याच कार्यालयात कुरिअर करण्यात आलेले ड्रग्ज पाठवले जाणार होते.
कस्टम विभागाची छापेमारी, नंतर अटक
कस्टम विभागाने बुधवारीफेलॉन यांना त्यांच्या जोगेश्वरी स्थित येथील निवासस्थानी छापेमारी केली. या छापेमारीत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबर रोजीच्या एका ड्रग्ज तस्करी प्रकरणात फेलॉन यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत होते.
एजाज खानही होता तुरुंगात
एजाज खान याचा पियून सुरज गौड याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. गौड याने दिलेल्या माहितीनुसार ड्रग्जचे पार्सल त्याच्याच नावावर यायचे. मात्र एजाजचा भाचा फरहान हाच ते पार्सल नियमित मागवायचा. या माहितीनुसार बुधवारी आणि गुरुवारी कस्टम अधिकाऱ्यांनी खानच्या निवासस्थानी छापेमारी केली. हे घर फेलॉन गुलीवालाच्या नावावर आहे. कस्टम अधिकाऱ्याच्या माहितीनुसार गुलीवाला यांच्या फ्लॅटवर 136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी ड्रग्जचे रिकामे पॅकेट्स, 28 ग्रॅम एमडी टॅबलेट तसेच अन्य नशा देणारे पदार्थ आणि 11 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. अभिनेता एजाज खानला 2021 साली नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने 4.5 ग्रॅम वजनाची 31 अल्प्राजोलम टॅबलेटसह अटक केलं होतं. या प्रकरणात एजाज खान साधारण 26 महिने तुरुंगात होता.
हेही वाचा :
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
