TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत खलबतं, रात्री सुमारे दोन तास अमित शाहांच्या निवासस्थानी चर्चा, दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार.
अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्लीतील बैठकीचा फोटो समोर, फोटोत एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असल्यानं चर्चांना उधाण.
शाहांसोबतची बैठक सकारात्मक झाली, येत्या २ दिवसांत निर्णय होईल, बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती तर कोणतीही नाराजी नाही, आम्ही तिघे एकत्र काम करणार, शिंदेंची प्रतिक्रिया.
नाराज वगैरे काहीही नाही, मी खुश आहे, फोटोबाबतच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर इतर कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद महत्त्वाचं, शिंदेंची भावना.
महाबैठकीत शिंदेंकडून १२ मंत्रिपदांसह विधानपरिषद सभापतीपदाची आणि गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी, मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय नाही .
अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे मुंबईत दाखल, देवेंद्र फडणवीस, अजित पवारही मुंबईत परतले.
फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीची आज मुंबईत बैठक, अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबाबत चर्चा होणार.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
