Pune Crime : पुण्यातील हत्याकाडांला वेगळं वळण, कट रचून 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची माहिती
Pune Crime news : शिवणेमध्ये राहणाऱ्या प्रद्युम्न कांबळे याचे शिवणे येथे राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी मुलीने प्रद्युम्नला फोन करुन बोलावून घेतल्याचे तपासात समोर आले आहे
![Pune Crime : पुण्यातील हत्याकाडांला वेगळं वळण, कट रचून 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची माहिती Maharashtra Pune Crime news 22 year old youth murder twist Pune Crime : पुण्यातील हत्याकाडांला वेगळं वळण, कट रचून 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/570888b688a0a298b43b0bcbe1103e14_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime : पुण्यातील शिवणे येथे 16 मार्च रोजी झालेल्या 22 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाले आहे. कट रचून या तरुणाची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
शिवणेमध्ये राहणाऱ्या प्रद्युम्न कांबळे याचे शिवणे येथे राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी मुलीने प्रद्युम्नला फोन करुन बोलावून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. यावेळी प्राजक्ताच्या घरातील सदस्यांनी प्रद्युम्नला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यात प्रद्युम्नचा मृत्यू झाला होता. अजय पायगुडे, विजय पायगुडे, वंदना पायगुडे आणि सागर राठोड या पाच जणांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे.
दोन वर्षापूर्वी मुलगी अल्पवयीन असताना तिचे प्रद्युम्न सोबत संबंध आल्याची माहिती मिळाल्यावर त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात मृत्यू झालेला प्रद्युम्न तीन महिने तुरुंगात राहून आला होता. बाहेर आल्यावर त्याचे मुलीसोबत प्रेमसंबंध सुरूच होते. मात्र कुटुंबीयांना ही गोष्ट मान्य नसल्याने प्रद्युम्न याचा कट रचून खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी जखमी प्रद्युम्न कांबळेला उपचारांसाठी वारजे माळवाडी इथल्या माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
Pune News : पुणे विमानतळावर 48 लाखांचे 3 हजार हिरे जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)