एक्स्प्लोर

Pune crime : पुण्यात 9 लाख रुपये किंमतीच्या दारूच्या पेट्या जप्त; तिघे अटकेत, एक फरार

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गोदामातून दारू चोरी केल्या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 लाख रुपये किंमतीच्या 110 दारूच्या पेट्या जप्त केल्या आहेत. 

Pune Crime:  पुण्यात काही नराधमांनी फिल्मी पद्धतीने गुन्हेगारीची घटना घडवून आणली आहे. मात्र पुणे पोलिसांकडून याच हल्लेखोरांवर कडक कारवाई केली आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गोदामातून दारू चोरी केल्या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 9 लाख रुपये किंमतीच्या 110 दारूच्या पेट्या जप्त केल्या आहेत. 

या प्रकरणात विभीषण काळे या आणखी एका आरोपीची ओळख पटली असून तो अद्याप फरार आहे. फरार आरोपी विभीषण काळे याच्यावर पोलिसांत यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींनी उसाच्या शेतात दारूच्या पेट्या लपवून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींनी दारूच्या गोदामाची भिंत तोडून मार्ग काढला होता. यानंतर आरोपी 12.65 लाख रुपयांची दारू घेऊन फरार झाले होते.

आरोपींनी ज्या गोदामात दारू चोरली होती ते गोदाम बाहेरील बाजूस होते आणि त्यामागील जागा पूर्णपणे रिकामी होती. कोणत्याही प्रकारचे घर किंवा इमारती नव्हत्या. याचा फायदा घेत आरोपींनी मागून भिंत तोडून गोदामात प्रवेश केला आणि 120 पेट्या घेऊन पळ काढला. गोदाम मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे पोलिसांकडून कारवाईचा धडाका

गणपती उत्सवापुर्वी पुणे पोलिसांनी शहरात करडी नजर ठेवायचा सुरुवात केली आहे. मोठा बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी पुणे गुन्हे शाखेने बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या चोरट्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच पिस्तूल आणि 11 काडतुसे जप्त केले होते. या प्रकरणी दोन आरोपींना अवैध पिस्तुल आणि 11 काडतुसांसह अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश प्रकाश जाधव (23) आणि मुजम्मील हारून बागवान यांचा समावेश होता. आकाश कात्रजमधील भिलारेवाडी येथील रहिवासी आहे तर मुजम्मिल अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील रहिवासी होते.

गणेशोत्सवानिमित्त पोलिसांचा विशेष बंदोबस्त
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या 10 दिवसात अनेक प्रकारचे गुन्हे समोर येतात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात होणार असल्याने नागरीकांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात असेल. त्यासाठी पोलिसांनी मागील काही दिवसांपासूनच शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. यात नागरीकांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हे रोखण्याला मदत होणार आहे. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget