एक्स्प्लोर
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही: ललिता

पुणे: ''ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर आज चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. सर्वजण भेटून अभिनंदन करत आहेत. पण ऑलिम्पिकपूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून वेळीच योग्य प्रतिसाद मिळाला नाही,'' अशी खंत रिओ ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साताऱ्याच्या ललिता बाबरने व्यक्त केली. ती पुण्यात बोलत होती. ''ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव झाला. सगळेजण भेटायला येऊ लागले. परंतु हे आधी व्हायला हवं होतं. हा खर्च आधी व्हायला झाला तर अधिक चांगले खेळाडू तयार होतील,'' असेही ती यावेळी म्हणाली. विशेष म्हणजे, तिने यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ''जर मला योग्य प्रतिसाद मिळाला असता, तर मी अधिक भरीव कामगिरी करू शकली असती,'' असं ती यावेळी म्हणाली याशिवाय रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांची जात शोधण्याच्या प्रयत्नचा निषेध केला. हा प्रकार चुकीचा असून सर्वांचंच रक्त एक आहे. खेळाडूंची जात शोधण्यापेक्षा त्यांची कामगिरी बघा, असा टोलाही तिने यावेळी लगावला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
कोल्हापूर
सोलापूर























