एक्स्प्लोर

IAS Pooja Khedkar : खेडकर कुटुंबीयांच्या घराला भलंमोठं कुलूप, पोलिस येऊन गेल्यानंतर कुणी आणि कधी कुलूप लावलं? 

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या आई, मनोरमा खेडकरांवर शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई, मनोरमा अद्याप पुणे पोलिसांसमोर हजर झाले नसून त्यांच्या बंगल्याला भलं मोठं कुलूप लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिस येऊन गेल्यानंतर हे कुलूप कुणी लावलं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

सोमवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक या बंगल्यावर दाखल झाले होते, मात्र त्यांना घरातून कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता या बंगल्याला एक  मोठं कुलूप लावण्यात आले आहे. हे कुलूप नेमके कोणी लावले? पोलिस येऊन गेल्यानंतर हे कुलूप कधी लावले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत माहिती देताना पोलिस म्हणाले, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत. ते सापडल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. जो गुन्हा झाला आहे त्याबाबत आम्ही त्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेऊ. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काहीचे मोबाईल नंबर आमच्याकडे नाहीत. त्या सर्वांचा शोध सुरू आहे. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.

पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलिस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

मनोरमा खेडकर यांनी बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत आले. आता त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आलं आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहवं लागेल. 

पूजा खेडकरांची कागदपत्रं सापडली

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. या प्रमाणपत्रांबाबतची कागदपत्रं सापडली आहेत. अहमदनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांमध्ये बैठक पार पडली. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड झाली नसल्याचं  डॉ. घोगरे यांनी सांगितलं.

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्रMVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget