Pune Rain: लोणावळा शहरात मुसळधार पाऊस सुरूच; 24 तासात 232 मिमी पावसाची नोंद, सतर्कतेचा इशारा
Pune Rain: लोणावळ्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 232 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. अद्याप मुसळधार पाऊस सुरू आहे.
Pune Rain: पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. पुण्यासह लोणावळा (Pune Heavy Rain) परिसरात शहरात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) कोसळत आहे. 24 तासांत लोणावळा शहरात 232 मि.मी. (9.13 इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर आज पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून पावसाची लोणावळ्यात (Lonavala Rain Update)जोरदार बॅटिंग सुरू आहे.
हवामान विभागाने पुणे घाट माथ्यावर दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. लोणावळा शहर व मावळ ग्रामीण भागात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 4047 मि.मी. (159.33 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लोणावळा शहरात जास्त पाऊस बरसला आहे.
हवामान विभागाकडून पुणे व सातारा घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा (Heavy Rain) अलर्ट जाहीर केला आहे. जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रेलचेल दिसून येत होती.
पुण्यासह सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट
आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain) वर्तवला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार (Heavy Rain)सुरू होती. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) रेड अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
रेड अलर्ट : पुणे, सातारा घाट माथा.
ऑरेंज अलर्ट : विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील संवही भागात ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट : कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे जळगाव आणि नंदुरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, वीइ प्रभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यली अलर्ट दिला आहे.