Pune Viral Shanta Pawar: पुण्यातील व्हायरल 'वॉरीयर आजींना' पुन्हा रस्त्यावर का यावं लागलं?
शांता पवार लाठी खेळत असल्याचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून आर्थिक मदत मिळाली मात्र दोन गवंड्यांनी फसवणूक केल्यामुळे आजी पुन्हा रस्त्यावर आल्या आहेत.
Pune Viral Shanta Pawar: रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि नेहा कक्करसारख्या (neha kakkar) बॉलीवूडमधील (Bollywood) अनेकांची मदत मिळवणाऱ्या आणि रस्त्यावर लाठीमार खेळून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या शांता पवार पुन्हा पुण्याच्या रस्त्यांवर लाठीमार खेळताना दिसत आहे. एका दिवसात करोडपती झालेली ही आजी पुन्हा सिग्नलवर लाठी खेळून कमाई करत आहे. शांता पवार (shanta pawar) लाठी खेळत असल्याचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून आर्थिक मदत मिळाली मात्र दोन गवंड्यांनी फसवणूक केल्यामुळे आजी पुन्हा रस्त्यावर आल्या आहेत.
आजीने एका गवंडीला घर बांधण्याचे काम दिले होते. गवंडीने त्यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले होते. त्या व्यवहारात त्यांची फसवणूक करण्यात आली. व्यवहारासाठी आलेल्या गवंडीने त्यांची फसवणूक केली, असं आजीचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा पवार आजींवर सिग्नलवर खेळ सादर करण्याची वेळ आली आहे.
शांता पवार या 86 वर्षांच्या आहेत. हडपसर येथील वैदवाडी गोसावी वस्तीत त्या राहतात. या वयात देखील त्यांना पैशासाठी रोज सिग्नलवर उभं रहावं लागतं. चार मुलं आणि सुनांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्यावर 17 नातवंडांची जबाबदारी आली. आजपर्यंत केलेल्या काबाडकष्टामुळे तीन नातवाचं लग्न झालं मात्र 14 नातवंडांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा खेळ सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटातदेखील आजीने केलंय काम
या पवार आजींनी फक्त पुण्यातील रस्त्यांवरच आपली कला दाखवल वाहवा मिळवली नाही तर त्यांनी अनेक जुन्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सीता और गीता, त्रिशूल, शेरणी यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलं असल्याचं त्या सांगतात. मात्र पतीच्या अचानक मृत्यू झाला. त्यानंतर संसाराची जबाबदारी त्यांच्यावर आली. हालअपेष्ठा सहन करत त्यांनी त्यांचं तारुण्य काढलं. अखेर त्यांनी छंदाला जोपासण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेले अनेक वर्ष झालं त्या पुण्यातील रस्त्यांवर काठीचा खेळ दाखवतात. अनेक पुणेकरांनी देखील आजीला आपलंसं करत मदत केली आहे.