एक्स्प्लोर
आई रागवली म्हणून पिंपरीत मुलीची आत्महत्या
साफसफाई न केल्याने आई रागवल्याने सेजलने जीवनयात्राच संपवली.
पिंपरी : आई रागवल्याने मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. सेजल मुदलियार असे या मुलीचे नाव आहे. सेजल आठवी इयत्तेत शिकत होती.
पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार समोर आला.
परीक्षा संपल्यानंतर सुट्ट्या सुरु झाल्या होत्या, त्यामुळे मुदलियार कुटुंबात गावी जाण्याची तयारी सुरु होती. त्यामुळे सेजल घरातच असायची.
सेजलचे आई-वडील कामावर जातात. त्यामुळे सेजलला घरातील साफसफाई करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र खेळण्याच्या नादात ती साफसफाई करण्याची विसरुन गेली. या कारणावरुन कामावरुन परतलेली आई सेजलला रागावली. त्यांनतर शुक्रवारी आई-वडील कामावर गेले, तेव्हा राहत्या घरात सेजलने गळफास घेतला आणि जीवनयात्रा संपवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement