एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या चारवर, कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मुलीसह टॅक्सीचालकही पॉझिटिव्ह
पुण्यात कोरोना ग्रस्तांची संख्या चारवर गेली आहे. मंगळवारी (10 मार्च) आणखी तीन संशयितांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त दाम्पत्याला मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या टॅक्सी चालकाचे नमुनेही पॉझिटीव्ह आले आहे.
पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 4 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुण्यात कोरोना ग्रस्तांची संख्या चारवर गेली आहे. मंगळवारी (10 मार्च) आणखी तीन संशयितांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त दाम्पत्याला मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या टॅक्सी चालकाचे नमुनेही पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या चारवर गेली आहे. आणखीही एका नवीन रुग्णाला कोरोनाची लागण असण्याची शक्यता आहे.
पुण्यातील पती - पत्नी 1 मार्च रोजी दुबईवरुन पुण्यात आले. हे दोघे एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते. मात्र एक तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले. मात्र आज त्यांना त्रास होऊ लागल्याने हे पती पत्नी तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमधे पोहचले. त्यानंतर त्यांची सॅंपल्स टेस्टिंगसाठी एन आय व्ही कडे पाठवण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आढळली. हे दोघे पती पत्नी दुबई वरुन आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती आणि दुबईमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं तोपर्यंत दिसून आलेलं नव्हतं. मात्र आता हे पती पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ते ज्यांच्यासोबत दुबईला गेले होते त्या 40 जणांच्याही टेस्ट कराव्या लागणार आहेत.
CoronaVirus Update | कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार : राजेश टोपे
कोरोना तपासणी पथके स्थापन
या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांचा समावेश असलेल्या पथकांचीही निर्मिती करण्यात येणार आहे. या पथकाद्वारे हे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येणार आहे. ही खातरजमा करतांना पथकाने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
संबंधित बातम्या :
Coronavirus | इराणच्या जेलमधून 70 कैद्यांना सोडले, तर भारतात कोरोना बाधितांची संख्या 55
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
क्रीडा
पालघर
व्यापार-उद्योग
Advertisement