एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धुकं, वाहनं जपून चालवा

मुंबई : राज्यभरात तापमानाचा पारा खालावलेला दिसत आहे. मुंबई-पुणे महामार्गालाही धुक्यानं वेढलं आहे. एक्स्प्रेस वेवर धुकं साचल्यामुळे वाहतुकीची गती काहीशी मंदावली आहे.
एक्स्प्रेस वे वर दाटलेल्या धुक्यामुळे अगदी काही अंतरावरची वाहनंही दिसत नाहीत. देहूरोड ते किवळे या दरम्यान धुक्याचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे.
रविवार असल्यामुळे अनेक जण मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करतात. त्यामुळे धुक्यात वाहनं चालवताना काळजी घेण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.
महाबळेश्वरात पारा खालावला, वेण्णा लेक भागात 0 अंश तापमान
महाराष्ट्राचं नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरात पारा कमालीचा उतरला आहे. महाबळेश्वरच्या सुप्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























