एक्स्प्लोर

Pune : पुण्यात ईडीकडून बड्या व्यावसायिकांवर छापेमारी, हसन मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन असल्याची माहिती

पुण्यातील बड्या व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. हे कनेक्शन थेट राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Mla Hasan Mushrif) यांच्याशी असल्याचं सांगितलं जातंय.

Pune news : पुण्यात (Pune) आज (3 एप्रिल) सकाळपासूनच ईडीच्या  (ED) अधिकाऱ्यांनी छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील बड्या व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. सकाळी सकाळीच ईडीनं शहरातील बड्या व्यावसायिकांवर छापेमारी सुरू केल्यानं पुणे शहर हादरून गेलंय. विशेष म्हणजे या व्यावसायिकांवर छापेमारी करण्याचं कनेक्शन थेट राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Mla Hasan Mushrif) यांच्याशी असल्याचं सांगितलं जातंय. वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया, विवेक गव्हाणे या व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यामुळं या छापेमारीकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या ब्रिक्स इंडिया कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील घरी ईडीकडून आज पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. चंद्रकांत गायकवाड राहत असलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील लापीस लॅझुली सोसायटीत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी केली जात आहे. चंद्रकांत गायकवाड हे संचालक असलेल्या ब्रिक्स इंडिया कंपनीकडून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारण्यात आला आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना देखील याच कंपनीकडून चालवला जातोय. मात्र, कोलकात्यातील बनावट कंपन्यांमधून ब्रिक्स कंपनीच्या माध्यमातून हे कारखाने ताब्यात घेण्यासाठी पैसे आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

हसन मुश्रीफ मनी लाँड्रिंगप्रकरणी पुण्यात ईडीकडून छापेमारी सुरु आहे. पुण्यातील बड्या व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर ही छापेमारी सुरु आहे. हे कनेक्शन हसन मुश्रीफ यांच्याशी असल्याचं सांगितलं जात आहे. वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया, विवेक गव्हाणे या व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर ही छापेमारी सुरु आहे. चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. नाना पेठेतील अनुतेज अपार्टमेंटमध्ये गायकवाड राहतात. ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय 5 एप्रिलला लागणार 

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी  दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय विशेष न्यायालयाने राखून ठेवला आहे. 5 एप्रिल रोजी याचिकेवर निकाल लागण्याची शक्यता आहे. मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी संरक्षण दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. तसेच तातडीने सुनावणी घेण्यासही सूचना केली होती. विशेष न्यायालयाने ईडी आणि मुश्रीफ यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला.

ईडीने न्यायालयात काय सांगितले? 

आमदार हसन मुश्रीफ यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि तीन समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच हजर झाले नसल्याचे ईडीनं न्यायालयात म्हटलं होते. त्यांची चौकशी कोल्हापुरात नोंदवलेला एफआयआर आणि कंपनी रजिस्ट्रारने दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. दोन्ही प्रकरणे सरसेनापती संताजी शुगर घोरपडे साखर कारखाना लिमिटेडचे शेअर्स शेतकर्‍यांना 10,000 रुपयांच्या ठेवींवर वाटप करण्यासंदर्भातील आधारित आहेत. 2011 मध्ये लोकसहभागातून साखर कारखाना उभारण्यासाठी निधी उभारताना मुश्रीफ यांना भांडवलाची गरज असल्याचा दावा ईडीने केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर 5 एप्रिलला फैसला; कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांची चौकशी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget