एक्स्प्लोर

डीएसकेंना ससूनमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवलं

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसकेंना ससून रुग्णालयातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसकेंना ससून रुग्णालयातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. मात्र, कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याचं सांगण्यात आलं. शिवाय यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. यानंतर डीएसकेंना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथं त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, डीएसकेंच्या वकिलांनी गंभीर प्रकृतीचं कारण पुढे करत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार कऱण्याची मुभा मागितली. जी मान्य करण्यात आली आहे. डॉ. चारुदत्त आपटे आज डीएसकेंची तपासणी करणार असल्याचं कळतं आहे. शिवाय उद्या (मंगळवार) सरकारी डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करेल. त्यानंतरच डीएसकेंना पुन्हा कोठडीत जावं लागेल की रुग्णालयातच विश्रांती घ्यावी लागेल, याचा निर्णय होईल. डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण शुक्रवारी काढून घेतलं. त्यानंतर त्यांना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक केली होती. काय आहे नेमकं प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणूकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे. 2014 पासून अनेकांनी घर बूक केलं. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला. सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली. इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले. सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं. मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी कोर्टाने डीएसकेंना पोलीस कोठडीत सुनावली आहे. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. संबंधित बातम्या
डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर
डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली! डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर "डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी! बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025
Thane BJP - Shiv Sena Conflict : ठाण्यात भाजप-शिवसेनेत राडा, नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Rupali Chakankar on Melegaon : मालेगावातील नराधमाला कठोर शिक्षा दिली जाणार- रुपाली चाकणकर
Mahapalikecha Mahasangram Yavatmal : यवतमाळमधील समस्या सुटणार का? नागरिकांच्या अपेक्षा काय?
Dubai Tejas plane Crash : दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; थक्क करणारा व्हिडिओ समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Nitish Kumar : नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
Dondaicha : दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
AUS vs ENG : पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, ॲशेस मालिकेच्या पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला
ॲशेसमध्ये पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, फलंदाजांची धूळदाण
Embed widget