एक्स्प्लोर

पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, दररोज 35 जणांना चावा

महापालिका एका कुत्र्यावर 650 असे वर्षाकाठी 3 कोटी खर्च करते. तरीही कुत्र्यांनी चावा घेण्याची संख्या वाढतच आहे.

पिंपरी चिंचवड : भटक्या कुत्र्यांच्या भीतीने सध्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. ही कुत्री रोज जवळपास 35 नागरिकांना लक्ष करत आहेत. महापालिका एका कुत्र्यावर 650 असे वर्षाकाठी 3 कोटी खर्च करते. तरीही कुत्र्यांनी चावा घेण्याची संख्या वाढतच आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने पिंपरी चिंचवड शहरातील श्रावणी गारगोठे जखमी झाल्या आहेत. चिंचवड गावात राहणाऱ्या श्रावणीच्या घराबाहेर एक कुत्रा भुंकत होता, त्याला हाकलण्यासाठी त्या बाहेर आल्या आणि कुत्र्याने त्यांच्या हातांना चावा घेतला. श्रावणीला ज्या भटक्या कुत्र्याने लक्ष्य केलं, त्याच कुत्र्याने इतर पाच जणांना चावा घेतला. तर शहरभरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना आणि लहानग्यांना बाहेर पडणं अवघड केलं आहे. गेल्या पाच वर्षातील जखमींची संख्या (आर्थिक वर्षानुसार आकडेवारी)            वर्ष                     जखमी संख्या
  • 2013-14                     9360
  • 2014-15                    9795
  • 2015-16                    10165
  • 2016-17                    10553
  • एप्रिल 2017-डिसेंबर2017    9568
पिंपरी चिंचवड शहरातील भटकी कुत्री रोज किमान 35 व्यक्तींना जखमी करतात. जखमींचा हा चढता आलेख रोखण्यासाठी महापालिका एका कुत्र्यामागे 650 रुपये असे वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्ची घालते. मात्र महापालिका प्रशासन या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. या सर्वाला वाढत्या हॉटेल संख्येकडे बोट दाखवण्यात महापालिका धन्यता मानत आहे. भटक्या कुत्र्यांनी पिंपरी चिंचवड शहरात अक्षरशः दहशत माजवली असताना, महापालिका प्रशासन केवळ जखमींची आकडेवारी नोंदवत आहे. महापालिकेने लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे, अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या संतापाचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका

होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Dahanu-Virar Local : मालगाडीचा अपघात; डहाणू- विरार लोकलसेवा ठप्प, कामावर जाणाऱ्यांची स्थानकावर गर्दीPM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 

Embed widget