एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amol Kolhe Instagram Froude: इंस्टाग्रामवर मेसेज करुन अमोल कोल्हेंच्या नावाने कोणी पैसे मागितले तर सावधान...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाने ऑनलाईन पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे.

Amol Kolhe Instagram Froude:  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाने ऑनलाईन पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. याबाबत स्वत: अमोल कोल्हे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. फेक अकाऊंट काढून त्यावर त्यांच्या नावाने पैसे उकळत असल्याचा प्रकार घडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी काही स्क्रिनशॉटदेखील शेअर केले आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अमोल कोल्हे यांच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. त्यावरुन हा पैसे उकळल्याचा प्रकार सुरु आहे.  20000 हजार रुपये ऑनलाईन पाठवण्याची मागणी केल्याची माहिती या पोस्टमध्ये दिसत आहे. या सगळ्या प्रकाराबाबात सावध राहण्याचा सल्ला त्यांनी चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टची चर्चा होते. चित्रपट असो किंवा राजकारण त्यांचे चाहते दोन्ही क्षेत्रात प्रचंड मोठ्या संख्येत आहेत. त्यांना आदर्श मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे कोणाची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांनी ही पोस्ट केली आहे.

पोस्टमध्ये नक्की काय आहे?

"@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या", असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

ऑनलाईन फ्रॉडपासून सावधान
सध्या सगळीकडे ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे. त्यात फेक आयडीवरुन मेसेज करुन पैसे उकळल्याचे प्रकरणं रोज समोर येत आहेत. या सगळ्या प्रकारापासून सावध रहा. खात्री केल्या शिवाय कोणाला पैसे पाठवू नका. या संदर्भातील रोज शेकडो तक्रारी जमा होत असल्याने पोलिसांकडून वारंवार अशा प्रकारे जनजागृती करण्यात येते. नागरीकांना आवाहन देखील करण्यात येतं मात्र नागरीक या सापळ्यात सहज ओढले जात असल्याचं चित्र रोज समोर येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget