एक्स्प्लोर
Advertisement
डेक्कन क्वीनच्या बर्थडेलाच पासधारकांची तिकीटधारकांना धक्काबुक्की
पुणे : मुंबई-पुण्याला जोडणारी डेक्कन क्वीन आज आपला 86 व्या वाढदिवस साजरा करत आहे, मात्र आज त्याच ट्रेनमध्ये तिकीटधारक प्रवासी आणि पासधारकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे सेलिब्रेशनला गालबोट लागलं.
जनरलच्या डब्यात जागा नसल्यानं तिकीटधारक प्रवाशांना पासधारकांच्या डब्यात बसण्याची परवानगी टीसीने दिली, मात्र पासधारक महिलांनी रिकाम्या जागा असतानाही जागा न दिल्याचा आरोप सामान्य तिकीटधारक प्रवाशांनी केला आहे. फक्त बसायलाच नाही, तर उभं राहण्यासही जागा न दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
पासधारक डब्यातल्या महिला या सामान्य प्रवाशांना जागा असतानाही बसू देत नाहीत, असा आरोप नेहमीच सामान्य प्रवासी करत आले आहेत. तीन जणांची आसनक्षमता असलेल्या सीटवर दोनच महिला बसून जागा अडवतात असा दावाही केला जात आहे.
इतकंच नाही, तर हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या प्रवाशाला दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रवाशांना उपद्रव देणे, दमदाटी करणे, धक्काबुक्की करणे यातही पासधारक मागेपुढे पाहत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन ही खरंच सामान्यांची आहे? की मूठभर पासधारकांची असा सवाल उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement