(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यास काँग्रेसचा विरोध; थेट नाना पटोलेंना पत्र
टिळक स्मारक ट्रस्टकडून देण्यात येणारा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे.
Lomanya Tilak Award : टिळक स्मारक (narendra modi) ट्रस्टकडून देण्यात येणारा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नेत्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र पाठवून विरोध केला आहे. राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही विरोधी विचारांना विरोध करत आहेत. देशात आणि परदेशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हे लोकशाही विरूध्द कृत्य करत असताना आपल्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी त्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांशी विसंगत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा, असं अरविंद शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे.
पुणे शहरामध्ये दरवर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. लोकमान्य टिळकांचा इतिहास स्वातंत्र्य काळाच्या आगोदरपासून हा काँग्रेसच्या विचारसरणीशी जोडलेला आहे. असं असतानादेखील आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी डॉ. रोहित टिळक यांच्याकडून नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषणा करण्यात आली आहे. त्यांची आणि लोकमान्यांनी विचारसरणी जुळत नाही त्यामुळे या पुरस्काराला विरोध कऱणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त स्व. जयंतराव टिळक अनेक वर्षे काँग्रेसच्या काळामध्ये विधानपरिषदेचे सदस्य होते. तसेच डॉ. रोहित टिळक हे एन. एस. यु. आय. चे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर कसबा पेठ विधान सभेतून त्यांना दोन वेळा उमेदवारी दिली गेली होती. एकिकडे आपले नेते राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही विरोधी विचारांना विरोध करीत आहेत. देशात आणि परदेशामध्ये सुध्दा नरेंद्र मोदी हे लोकशाही विरूध्द कृत्य करीत असताना आपल्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी त्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांशी विसंगती असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार जाहिर करणे आणि बोलवणं हे अत्यंत खेदजनक वाटत आहे. त्याचा रोष संपूर्ण पुणे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणून आपल्या स्तरावर आपण डॉ. रोहित टिळक यांना समज द्यावी आणि कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला द्यावा, अशी विनंती अरविंद शिंदे यांनी नाना पटोलेंना केली आहे.
शरद पवारांनादेखील आमंत्रण
1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे 1ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचं रोहित टिळकांनी सांगितलं. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे सत्तानाट्यानंतर पहिल्यांदात राजकीय नेत्यांची मोठी फळी या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत.
संबंधित बातमी-