एक्स्प्लोर

Nana Patole : भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’; जनता आता भाजपाच्या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही: नाना पटोले

भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

पुणे : सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने मागील १० वर्ष फक्त अदानीसाठी काम केले, हे सरकारच अदानी सरकार होते पण जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का? वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. 2014  व 2019 मध्ये भाजपाने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे.

महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरींनी माफी मागावी.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि कायमचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे असंही नाना पटोले म्हणाले.

जाहीरनाम्यात आपल्या जुन्या योजनांचा विस्तार केला?

भाजपने आपल्या या जाहीरनाम्यात आपल्या जुन्या योजनांचा विस्तार केला जाईल, असे सांगितले आहे. महिला, तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. देशाची अर्थव्यवस्था कशी वाढेल, यावरही आम्ही काम करू, असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे मोदी सत्तेत आल्यास या आश्वासनांची अंमलबजावणी होणार का? भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Rupali Chakankar On Sharad Pawar : शरद पवारांच्या वक्यव्यावर रुपाली चाकणकर भडकल्या; म्हणाल्या सुनांना...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला? जबाबातील विसंगतीने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
गोविंदाच्या मिसफायरप्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना वेगळाच संशय, 'हिरो नंबर वन'ने ट्रिगर स्वत:च दाबला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये कुटुंबाने सामूहिकरित्या संपवलं जीवनGovinda Gun Fire : अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलीस गोविंदाच्या जबाबावर समाधानी नाहीत:सूत्रCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaSahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला? जबाबातील विसंगतीने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
गोविंदाच्या मिसफायरप्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना वेगळाच संशय, 'हिरो नंबर वन'ने ट्रिगर स्वत:च दाबला?
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Prakash Ambedkar: देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका, 18 बँक खाती सील, अदिती तटकरेंकडून यादी पोस्ट
लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्या भावांवर कारवाई , 18 बँक खाती सील, अदिती तटकरेंनी यादी दिली
Embed widget