बाईपणाचा बाजार मांडू नये, मासिक पाळी तपासण्यासाठी शाळेतील मुलींना विवस्त्र केल्याच्या प्रकारावरुन भाजपच्या चित्रा वाघ संतापल्या ..
Pune : इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला .
Pune :राज्यातील गुन्हेगारीचा घटनांवर आता राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होऊ लागला आहे . इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला . मुलींच्या आत्मसन्मानाला काळीमा फासणारी ही घटना आहे . शाळेत मुलींना सुरक्षित वाटले पाहिजे . बाईच्या बाईपणाचा बाजार मांडला जाऊ नये . ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्या घरी मुली नाहीत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला .या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून आणखी कोणी यात सामील आहे का हे तपासणार असल्याचंही त्या म्हणाल्यात .
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. विद्यार्थिनीच्या आत्मसन्मानावरची ही घटना आहे .पाळी येणे हा गुन्हा नाही शाळेत सरंक्षित वाटले पाहिजे .
पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे .पण आणखी काही गुन्हेगार आहे का हे बघणार . बाईच्या बाईपणाचा बाजार मांडला जात नये . हे कोठेही होत कामा नये . पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्या घरात मुली नाही का या मुलींना सरंक्षण देणे गरजेच आहे असे होऊ नये म्हणून खबरदारी द्यायला हवी
आम्ही अशी वागणूक खपवून घेणार नाही
सांगलीच्या आटपाडीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे आमच्या स्वाती शिंदे जाऊन आल्या आहेत . जीव देऊ नका पोलीस सोबत आहेत 112 नंबर आहे . यात जितकी सुधारणा करता येईल तेवढे शासन सुधारणा करत आहे .
आपल्याला आपली वाटायला हवी शाळा पण त्या ठिकाणी धिंडवडे काढले जात आहेत .या प्रकरणाला लाइटली घेणार नाही असंही त्या म्हणाल्या .
शहापूरमधील एका शाळेमध्ये स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह अशी शारीरिक तपासणी केल्याची घटना घडली आहे. मासिक पाळीला सामोरे जात असताना मुलींच्या शरीरात, मनात होणारे बदल यात त्यांची मानसिकता संवेदनशील असताना..१/३
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) July 10, 2025
नेमके प्रकरण काय?
हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एक शिपायाचा समावेश आहे.
























