एक्स्प्लोर
क्रिकेटवर सट्टा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक
क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावण्यात आला होता. निगडी पोलिसांनी जावेद शेख यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे.
सट्ट्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य, लॅपटॉप, मोबाइल आणि 53,500 रुपये रोकड असा एकूण 2 लाख 77 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. चिखलीतील मित्तल इमारतीतील एका फ्लॅटमध्ये हा सट्टा सुरू होता.
दरम्यान, प्रकरणी पाच जणांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement