एक्स्प्लोर

बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली! महात्मा गांधींचा म्हातारा असा उल्लेख करत म्हणाले...

Bandatatya Karadkar controversial statement पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते.  

पिंपरी चिंचवड : भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. अन् पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं भारताला स्वराज्य मिळवायला एक वर्ष लागलं असतं, असं लोकमान्य टिळकांचं एक वाक्य असल्याचं ही बंडा तात्या म्हणालेत. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते.  

बंडा तात्या कराडकर नेमकं काय म्हणाले...

बंडा तात्या कराडकर म्हणाले की, दहा वर्षाच्या काळात भगतसिंहानी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. त्या काळात सुरुवातीला भगतसिंहांवर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद भगतसिंहांच्या मनामध्ये ठासवला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. 1922ला एक हत्याकांड झालं, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंह महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही, असं कराडकर म्हणाले. 

बंडातात्या कराडकर म्हणाले की, भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या म्हाताऱ्याच्या 'या' मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. हे उपयोगाचं नाही, कारण लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच 1947साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया. त्यामध्ये पोलिसांची कार्यालये, सरकारी कार्यालय पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या ज्या घटना घडत गेल्या. यातून इंग्रजांनी बोध घेतला, की आता भारत देश सोडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी असं सांगितलं जातं की 'साबरमती के संत तुने कर किया कमाल, दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल.' असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांचे फोटो इथे मागे आहेत. त्या साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे, असं कराडकर म्हणाले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
Rainfall Landslide : उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 600 मिमी पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणे म्हणाले...
600 मिमी पाऊस झाल्यानं दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणेंनी सांगितले पूर्वसंकेत...
Pune Rain News: मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
Ketan Agrawal Death Case :
"45 वर्षांची ओळख होती म्हणून जास्त चौकशी केली नाही"; केतनच्या आजोबांनी सांगितली लग्न जमवण्याआधी केलेली 'ती' मोठी चूक

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget