Guillain Barre Syndrome: 'गुलेन बॅरी सिंड्रोम'ला कारणीभूत जीवाणू आढळला; हा नेमका कसा पसरतो? जाणून घ्या सविस्तर
Guillain Barre Syndrome: पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
पुणे: पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुणे शहरातील गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) एकूण 67 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 39 रुग्ण पुणे ग्रामीण, 13 रुग्ण पुणे महापालिका आणि 12 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका व 3 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी 43 पुरुष व 24 महिला आहेत. यापैकी 13 रुग्ण व्हेन्टिलेटरवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता महानगरपालिका अलर्ट मोडवरती आली असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत, ज्या भागात जास्त रूग्णसंख्या आढळून येत आहे, त्या भागातील पाण्याची तपासणी, पाणी पुरवठा केली जात असलेले पाणीसाठे यांचे नमुने देखील तपासले जात आहेत. दरम्यान गुलेन बॅरी सिंड्रोमला कारणीभूत असलेला जीवाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.
'जीबीएस'ला कारणीभूत जीवाणू कोणता
'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) (Guillain Barre Syndrome) रुग्णांच्या नमुन्यात 'जीबीएस'ला (Guillain Barre Syndrome)कारणीभूत असलेला 'कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी' हा जीवाणू आढळला आहे. हा जीवाणू दूषित पाण्याच्या माध्यमातून पसरतो. यामुळे सध्याची वाढलेली 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) (Guillain Barre Syndrome) रुग्णसंख्या ही दूषित पाण्यामुळेच वाढली असल्याच्या माहितीवरती शिक्कामोर्तब झालं आहे.
काल (गुरुवारी, 24) 'एनआयव्ही' कडून उशिरा काही रुग्णांचे तपासणी अहवाल मिळाले आहेत. त्यापैकी काही अहवालात 'कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी जीवाणू सह 'नोरोव्हायरस' विषाणू आढळला आहे. 'नोरोव्हायरस' हा उलट्या, जुलाबास कारणीभूत ठरतो. पुणे शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन आठवड्यांपासून 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) (Guillain Barre Syndrome) या मेंदूविषयक आजाराचे अचानक रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे आणि शौचाचे नमुने 'एनआयव्ही'कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. जीवाणू अथवा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये एक ते तीन आठवड्यांनी प्रतिकारशक्ती शरीरातील नसांवर हल्ला करते व परिणामी 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) (Guillain Barre Syndrome) होतो, अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )